ओढ मिलनाची…( प्रेमकथा)

ओढ मिलनाची…( प्रेमकथा)

    पहाटे पाचचा गजर झाला तशीच स्वरा लगबगीने उठून आवरायला लागली. आज खूपच उत्साहात होती स्वारी, कारणही तसेच होते. तब्बल सहा महिन्यांनंतर ती मयंकला भेटणार होती. आठ वाजता मयंक पोहोचणार तेव्हा त्यापूर्वी तयार होऊन एअरपोर्टवर जायचा तिचा प्लॅन होता. आंघोळ करून आली तशीच ओल्या केसांना सुकवत स्वतः ला आरशात निरखून...Read more
कोण होतीस तू👸🥰☺️… काय झालीस तू..😣😢

कोण होतीस तू👸🥰☺️… काय झालीस तू..😣😢

नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघणारच होती तितक्यात मोहन म्हणजेच तिचा पती तिची वाट अडवून म्हणाला, “माहेरी जायला निघाली आहेस खरी पण रिकाम्या हाताने परत येणार असशील तर मुळीच घरी येऊ नकोस. भावांकडून घराचा हिस्सा घेतल्याशिवाय परत आलीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही. ” नलिनीच्या डोळ्यात चटकन पाणी आले....Read more
यशापयशाचे अवकाश

यशापयशाचे अवकाश

डॉ. चिटणीस एक प्रसिद्ध समुपदेशक (काऊन्सेलर ). आज अमेयची अपॉइंटमेंट होती त्यांच्याकडे. अमेय विषयी संपूर्ण माहिती एकत्र करून बनविलेली फाइल असिस्टंट मनिषा  चिटणीसांना देत म्हणाली, “सर , अमेयचे आई वडील येत आहेत त्याला घेऊन. हि त्याची फाइल, त्याच्या घरच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत परिस्थिती मी तुम्हाला सांगते.” मनिषा बोलू लागली, “सर,...Read more
तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम)

तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की विनय ने मोनाला भेटायला बोलावले. त्याला मानसी च्या वाढदिवस साठी काही तरी खास प्लॅन करायचा होता आणि त्यात मोनाची मदत हवी होती. मोनाला विनय आवडायचा त्यामुळे तिला वाटले की तो तिला प्रपोज करणार आहे. तेव्हा मनोमन ती आनंदी झाली होती. त्याला भेटल्यावर तिला जेव्हा कळाले...Read more
तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला

तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला

       मानसीचा आज पहिलाच दिवस होता कॉलेजमधला. कॉलेजच्या भल्या मोठ्या इमारतीचे निरीक्षण करताना ती एका वेगळ्या विश्वात रमलेली तितक्यात एक वाक्य कानावर पडले. “हाय मानसी..!” या अनोळखी कॉलेजमध्ये माझं नावं घेत कुणी हाक  मारली असावी या विचाराने गोंधळून तिने मागे बघितले तर मागे विनय उभा होता. विनय आणि मानसी...Read more
स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )

स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )

     मीरा खिडकीतून बाहेर लुकलुकणारे चांदणे बघत होती. माधवला यायला उशीर झाला त्यामुळे त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघताना नकळत चांदण्यात रमली. जरा वेळ तो चांदण्यांचा लपाछपीचा खेळ बघून भरकन खोलीत गेली, एक कोरा करकरीत कागद आणि बॅगेतून काढलेले काही रंग, ब्रश घेऊन खिडकीजवळ स्थिरावली. समोरचे डौलदार कडूनिंबाचे झाड, त्या...Read more
होम मिनिस्टर तू या घरची…

होम मिनिस्टर तू या घरची…

        गौरव घरी आला तसंच त्याचा उदास चेहरा बघून प्रियाने ओळखले की आज नक्कीच काहीतरी बिघडलंय. ऑफिसमधून घरी येताच नेहमी तो सोफ्यावर बॅग फेकत दोन्ही मुलांसोबत अगदी लहान होऊन खेळायला लागतो पण आज मात्र हातातली बॅग अगदी व्यवस्थित जागेवर ठेवून बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तोच दोन्ही मुले बाबांना...Read more
विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

   लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.    ...Read more
विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

    मोनिका ची आई हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या बेड शेजारी पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेली होती. औषधांमुळे मोनिकाला झोप लागली होती. तितक्यात मयंक तिला भेटायला आला तशीच मोनिकाची आई त्याला म्हणाली, “खबरदार मोनिकाच्या आसपास दिसलास तर… माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली… विश्वासघात केला तू…आता यापुढे तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.. तुझ्यामुळे तिच्यावर...Read more
नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘

नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘

    शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्‍याचा डबा बनवून मुलांना‌ तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..”     धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्‍याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय...Read more