संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )

संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )

प्रिय दादा, रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा 😊 यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू...Read more
मैत्री बनली जगण्याची उमेद…

मैत्री बनली जगण्याची उमेद…

सुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”...Read more

सासर ते सासरच असतं…

       सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.    सासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि...Read more

आईची दुहेरी भूमिका…

रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना...Read more

स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून. आई...Read more

जन पळभर म्हणतील हाय हाय….

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय ? कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत. सखेसोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील, बसतील, हसुनि खिदळतील, मी जातां त्यांचें...Read more
बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत...Read more
तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

तिला काही सांगायचंय.. हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची. लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील...Read more
रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा...Read more

पाणी मिळेल का पाणी..

रवी नामक एक‌ गृहस्थ दुचाकीवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याश्या हॉटेलवर थांबून हॉटेल वाल्याशी संवाद साधत होता. “दादा, जरा पाणी मिळेल का प्यायला..” हॉटेल वाला – “हो मिळेल ना, किती पाहिजे.. अर्धा ग्लास ५ रूपये,  एक ग्लास १० रूपये..पाणी बॉटल ४० रूपये..” “अहो, मी पाणी मागतोय, कोल्ड ड्रिंक्स किंवा चहा...Read more