नातेसंबंधात स्पेस का हवी? हवी का?

रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली...Read more

साथ लाभली वृद्धाश्रमाची…

Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे. साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी...Read more

वडिल

“आई असते जन्माची शिदोरी,जी सरतही नाही आणि उरतही नाही”तसेच वडील म्हणजे ते , जे म्हणतात “सोड ती चिंता सारी, आनंदात रहा तू बाळा, तुला असं उदास बघून मला लागत नाही डोळा”. हे अगदी खरं आहे. आपल्या मुलांच्या आनंदात वडीलांचे सुख असते. कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी वडील सतत धडपडत असतात. ऊन पाऊस...Read more

आज काय घालू.. माझ्या कडे तर कपडेच नाही

ती : (सगळे कप्पे पुर्ण पणे भरून असलेल्या कपाटात बघून) अरे, मी आज काय घालू.. माझ्या कडे तर कपडेच नाही.तो : (गमतीच्या सुरात चिडवत) अगं इतकं काय त्यात, माझे कपडे घालून जा आॅफिसला. ती : गप्प बस तू. खरंच अरे आॅफीसला घालायला कपडेच नाही मला. तो : (आश्चर्याने कपाटात डोकावून)...Read more

Extramarital Affair – भाग २ ( अंतिम भाग)

मागच्या भागात आपण पाहीले की आभा आणि मनिष‌ यांची बॅडमिंटन खेळताना ओळख होते आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरवात होते. आता‌ पुढे. दररोज सकाळी आभा आणि मनिष बॅडमिंटन खेळण्याच्या निमित्ताने भेटायचे, खेळून झाल्यावर कधी ज्यूस घ्यायला तर कधी एकत्र नाश्ता करायला दोघेही जायचे. मनिष बडबड्या, विनोदी स्वभावाचा त्यामुळे आभाला त्याच्याशी गप्पा...Read more

अनोळखी नातं..

रीयाने आनंदात अमेयला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली. जय म्हणजेचं रीयाच्या होणार्‍या नवर्‍याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमेयला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे जय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती. अमेय शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत...Read more

संसाराचा गाडा सुरळीत चालवायला दोघांचीही गरज..

नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते...Read more