विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

   लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.    ...Read more
विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

    मोनिका ची आई हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या बेड शेजारी पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेली होती. औषधांमुळे मोनिकाला झोप लागली होती. तितक्यात मयंक तिला भेटायला आला तशीच मोनिकाची आई त्याला म्हणाली, “खबरदार मोनिकाच्या आसपास दिसलास तर… माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली… विश्वासघात केला तू…आता यापुढे तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.. तुझ्यामुळे तिच्यावर...Read more
तू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )

तू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )

आरती दिसायला साधारण, मध्यम बांधा, सावळा वर्ण, अभ्यासात हुशार, मनमिळाऊ स्वभावाची. वडील लहानपणीच देवाघरी गेले त्यामुळे आई आणि दोन मोठ्या भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली. दोन्ही भाऊ नोकरीला लागले तसेच योग्य स्थळ बघून आईने दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. दोघेही नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात‌, आपापल्या संसारात व्यस्त. त्यावेळी आरती कॉलेजमध्ये होती....Read more
सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

राघवला काय उत्तर द्यावे याचा विचार करत नेत्राच्या मनात झालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. काही उत्तर न देता ती कॉलेजनंतर आश्रमात परतली. माईंना आज तिच्या वागण्यात बराच बदल जाणवला. हसत खेळत राहणारी नेत्रा आज विचारात मग्न होती, चेहऱ्यावर एक काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी न राहावता माईंनीच तिला विचारले,...Read more
मैत्री बनली जगण्याची उमेद…

मैत्री बनली जगण्याची उमेद…

सुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”...Read more
पूरग्रस्ताचे मनोगत…

पूरग्रस्ताचे मनोगत…

नमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला.    खरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू होता. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे...Read more

आईची दुहेरी भूमिका…

रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना...Read more

अशीही एक सावित्री…

“मॅडम, इधर क्या करने आयी है..अच्छे घर की लग रही..ये रेड लाइट एरिया है..पता है ना..” एक लाल भडक लिपस्टिक लावलेली , जरा विचित्र पोझ देत उभी असलेली, तोडके कपडे घातलेली एक चाळीशीतली स्त्री सविता कडे बघत बोलली. सविता तिच्या कडे किळसवाण्या नजरेने बघत इच्छा नसताना उत्तरली, “अहो बाई, माझा...Read more
बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत...Read more
तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

तिला काही सांगायचंय.. हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची. लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील...Read more