संसाराचे ब्रेकअप

संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच.. आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..” होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला...Read more

उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे...Read more

तिच्या सौंदर्याचे कोड

रीमा आई वडीलांना एकुलती एक मुलगी, गव्हाळ वर्ण असलेली पण नाकी डोळी नीटस, उंच बांधा, आकर्षक शरीरयष्टी, काळेभोर लांबसडक केस, जरा मेकअप केला की एखाद्या अभिनेत्रीला मागे टाकेल असं तिचं सौंदर्य. पण या सौंदर्यावर ‘कोड’ पसरलं आणि परिस्थिती बदलली. रीमा लहानपणापासून नृत्य कलेत तरबेज. जणू नृत्य आणि मॉडेलिंग तिला जन्मताच...Read more

कपड्यांवरून व्यक्तीमत्व ठरविणे- योग्य की अयोग्य

“अय्या हीच का मोना, पंजाबी ड्रेस घालून आली लग्नात. होणार्‍या सासरची मंडळी भेटतील तर साडी नेसून जावं इतकं कसं कळत नसेल तिला. तुझी सून आतापासूनच मर्यादा ओलांडत आहे बघ रमा. तू तर म्हणाली होती की मुलगी संस्कारी घरातील आहे म्हणून. ” सुजयच्या काकू त्याच्या आईला म्हणाल्या. सुजयच्या आईला ते ऐकून...Read more

नात्यात स्पेस का हवी? हवी का?

रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली...Read more

तिमीरातूनी तेजाकडे..भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की शामरावांनी आत्महत्या केल्यावर सुमित्राला संसाराचा गाडा चालवताना अनेक खस्ता खाव्या लागल्या त्यात काही वर्षांनी आजीही गेली. होती नव्हती ती जमिन कर्ज फेडण्यासाठी विकावी लागली. सुमित्रा आता दोन मुलांना घेऊन दुसर्‍यांकडे शेतीचे, कुणाच्या घरचे घरकाम करून संसार चालवत होती. गणेश म्हणजेच सुमित्राच्या मुलाला आईच्या कष्टाची जाणीव...Read more